शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पुण्यनगरी झाली माऊलीमय, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 5:04 PM

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह लाखो वारकऱ्यांच्या आगमनाने पुण्यनगरी माऊलीमय बनली आहे.त्यातच रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून अनेकांनी सहकुटुंब दर्शनाला गर्दी केली आहे.

पुणे :संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह लाखो वारकऱ्यांच्या आगमनाने पुण्यनगरी माऊलीमय बनली आहे.त्यातच रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून अनेकांनी सहकुटुंब दर्शनाला गर्दी केली आहे. विठुरायाच्या दर्शनाकरिता मैलोन मैल चा प्रवास करुन पंढरीकडे निघालेल्या वारकरी भक्त काही काळ विश्रांतीकरिता पुण्यात थांबले आहेत.  वारकरी बांधवांनी पुण्यात विश्रांती घेतली की त्यानंतर त्यांच्या सेवेत पुणेकर आनंदाने सहभागी झाल्याचे बघायला मिळाले. याप्रसंगी कुणी त्यांचे पाय चेपून दिले , कुणी हातापायांना मालिश केली. जमेल तितकी सेवा करुन विठ्ठ्ल दर्शनाचा लाभ त्या सेवेतून घ्यायचा. असा त्या सेवेमागील उद्देश साधून सेवेकरिता शहरातील विविध संघटना, सेवा भावी संघ, गणेश मंडळे, प्रतिष्ठान गर्दी केली.याशिवाय आजूबाजूच्या घरातून पिठलं भाकरीच्या पंक्तीसाठी आमंत्रणे करण्यात आली.  

बाजारपेठांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहवयास मिळत आहे.रस्त्याच्या दुतर्फा खरेदीसाठी विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. फेरीवाल्यांची जागा मिळविण्यासाठी धडपड सुरु असून याबरोबरच प्रसादाचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. भाविकांना पालखीचे दर्शन घेण्यासाठी कुठलीही अडचण होवू नये, रांगेत अनुउचित प्रकार घडू नये आणि गर्दीमुळे भाविकांचा गोंधळ होवू नये यासाठी रांगेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. पावसाची खबरदारी घेवून निवा-यासाठी मोठमोठे मंडप टाकण्यात आल्याने भाविकांसाठी सुरक्षित निवारा तयार झाला आहे. पत्ता चुकणा-यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जागोजागी मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. विशेषत: या सर्व मदत कार्यात विविध महाविद्यालये, त्यातील एनएसएस, एनसीसी, याबरोबरच  मंडळाचे कार्यकर्ते पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले आहेत.  

राजकीय सेलिब्रिटींची मांदियाळी 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. सामान्य पुणेकरांसह या सेलिब्रिटी दर्शनामुळे पोलिसांची तारांबळ उडालेली बघायला मिळाली. 

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा