शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

Ashadhi Wari: संत तुकोबांच्या पादुकांचे सराटीला निरा स्नान; भक्तिमय वातावरणात पालखीचा पुणेकरांना निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 3:34 PM

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सराटीच्या पुलावरून सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ

बावडा (पुणे) : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने (Sant Tukaram Maharaj palkhi Sohala) आज (दि. १२ जुलै) पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. सराटी गावी मुक्काम असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अकलूज दिशेने प्रस्थान ठेवण्यापूर्वी आज नीरा नदीच्या सराटी येथील घाटावर तुकोबांच्या पादुकांचे फुलांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आले. यावेळी तुकोबांच्या पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने संत तुकाराम महाराज देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे यांच्या व विश्वस्तांच्या हस्ते स्नान घालण्यात आले. (Ashadhi Wari) 

तत्पूर्वी सराटी येथे पालखी आगमनापूर्वी इंदापूर वरून काल (दि. ११ जुलै) रोजी विठ्ठलवाडी, वडापुरी, सुरवड गावात ग्रामस्थ ग्रामपंचायत वतीने पालखीचे दिमाखात स्वागत केले. सुरवड येथे देहू संस्थानच्या पदाधिकारी यांचा सन्मान प्रसाशक युनूस शेख, ग्रामसेवक भोसले यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर पालखी सोहळा वै. शेरकर महाराज समाधी स्थळापासून वकीलवस्ती येथे काही काळ थांबला. पुढे बावडा गावाच्या वेशीवर गेल्यावर पालखीचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कुटुंबीयांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यानंतर बावडा बाजार तळ या ठिकाणी दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दर्शन रांगेत दर्शन घेत होते पुढे  बावडा येथून पालखी सराटीकडे मार्गस्थ झाली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पालखी पादुकाचे सराटी येथील परंपरागत नीरा स्नानाला महत्त्व आहे. देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यासह देहू संस्थांचे पदाधिकारी चोपदार,टाळकरी, विणेकरी, मृदुंग वादक, झेंडेवाले, तुळशीवाल्या महिला वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठी वसलेले सराटी गाव पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टप्प्यावर वसलेले असल्याने सकाळी निरास्नान आटोपल्यानंतर ८ वाजता संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सराटीच्या पुलावरून सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ झाली.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाSolapurसोलापूरPandharpurपंढरपूर