बावडा : पंढरीसी जाय, तो विसरे मायबाप! अवघा होय पांडुरंग, राहू धरोनिया अंग! न लगे धनमान, देहभावे उदासीन! तुका म्हणे मळ, नाशितत्काळते स्थळ! या अभंगाप्रमाणे पंढरीची ओढ लागलेल्या वैष्णवांनी पुणे जिल्ह्यातील २२२ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून बुधवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. आता अवघ्या ४५ किलोमीटरचा प्रवास राहिला असून वैष्णवांना पंढरीची ओढ लागली आहे.तत्पूर्वी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पादुकांना सकाळी सराटी तालुका इंदापूर येथे नीरा नदीमध्ये उत्साहात स्नान घालण्यात आले.काल सायंकाळी वैष्णवांचा मेळा पालखीसह पुणे जिल्ह्यातील सराटी गावी मुक्कामासाठी थांबला. गाव व परिसरातील भाविकांनी या ठिकाणी संत तुकारामांच्या पादुकांचे दर्शन घेतले. रात्री या ठिकाणी कीर्तन, भारुड अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी सराटीनगरी दुमदुमून गेली होती.आज सकाळी सात वाजता सनईच्या सुरात पालखी स्नानासाठी नीरा नदीमध्ये नेण्यात आली. त्यावेळी शिंगटाच्या ललकारीने आसमंत दुमदुमला. त्या ठिकाणी पांडुरंगाची आरती घेऊन तुकोबांच्या पादुकांना भावपूर्वक स्नान घालण्यात आले. सकाळी आठ वाजता सराटी येथून पालखीने सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान केले.पालखी प्रस्थानावेळी गावचे प्रमुख नेते आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, पोलीस निरीक्षक मधुकर पवार, हनुमंतराव कोकाटे, सरपंच बापू कोकाटे, उपसरपंच सचिन कोकाटे, ग्रामसेवक हनुमंत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पुणे जिल्ह्यातून अखेरचा निरोप दिला. त्यानंतर नीरा नदीवरील पुणे-सोलापूर पूल ओलांडून पालखीने सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे प्रस्थान केले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. हनुमंत डोळस, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीताई मोहिते-पाटील आदींनी पालखीचे पुणे-सोलापूर सीमेवर स्वागत केले.
संत तुकोबांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 9:06 PM
पंढरीची ओढ लागलेल्या वैष्णवांनी पुणे जिल्ह्यातील २२२ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून बुधवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. आता अवघ्या ४५ किलोमीटरचा प्रवास राहिला असून वैष्णवांना पंढरीची ओढ लागली आहे.
ठळक मुद्देसराटीत पादुकांना नीरास्नान करून पुणे जिल्ह्यातून निरोपनीरा नदीवरील पुणे-सोलापूर पूल ओलांडून पालखीने सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे प्रस्थान आता अवघ्या ४५ किलोमीटरचा प्रवास राहिला असून वैष्णवांना पंढरीची ओढ