शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

संतोष जाधव याला सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी मिळाले साडेतीन लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 7:52 PM

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येसाठी ८ शार्प शूटरांना सांगण्यात आले होते

पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात एकूण ८ शार्प शूटरांना सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील शार्प शूटर संतोष जाधव याला याप्रकरणात साडेतीन लाख रुपये मिळाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हे पैसे नवनाथ सूर्यवंशीला मिळाले असून त्या पैशांचा पोलीस शोध घेत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून संतोष जाधव व नवनाथ सूर्यवंशी यांना १२ जून रोजी अटक केली होती. त्यांच्याकडे पंजाब पोलीस व हरियाना पोलिसांनी कसून चौकशी केली. मुंबई पोलिसांनीही दोघांकडे तसेच महाकाल याच्याकडे चौकशी केली आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येसाठी ८ शार्प शूटरांना सांगण्यात आले होते. या सर्वांना प्रत्येकी साडेतीन लाख रुपये दिल्याचे पंजाब पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. गायक सिद्धू मुसेवाला याची २९ मे रोजी हत्या करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात महाकाल याने याबाबतची माहिती दिली. हत्येनंतर १ जून रोजी नवनाथ सूर्यवंशी याचा सिद्धेश महाकाल याला सिग्नल ॲपवर कॉल आला होता. त्याने काम झाले आहे. साडेतीन लाख रुपये मिळाले आहे. सेफ झाल्यावर, तू मला कॉल कर, असे सांगितले. त्यासाठी त्याने सिद्धेश याला एक मोबाईल नंबर दिला. तो मोबाईल नंबर सिद्धेश याने जय हो या नावाने सेव्ह केला होता. त्यावेळी नवनाथ सूर्यवंशी सिद्धेशला म्हणाला की, तू मला अकाऊंट नंबर दे, मग मी तुला पैसे पाठवेल. त्यावेळी सिद्धेश याने त्याला विचारले की, तुम्ही कोठे आहे, तेव्हा त्याने सांगितले की, मी गुजरातला आहे व संतोष पण तिकडे येणार आहे.नवनाथ सूर्यवंशी ज्या साडेतीन लाख रुपयांचा उल्लेख करतो, ते पैसे मुसेवाला हत्या प्रकरणात शार्प शूटरांना दिलेल्या पैशांपैकी आहेत.

याबाबत नवनाथ सूर्यवंशीकडे ग्रामीण पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र, नवनाथ याने हे पैसे कोणत्या खात्यात जमा केले अथवा कोठे ठेवले आहेत, याची काहीही माहिती अजून पोलिसांना दिलेली नाही. मुसेवाला हत्येच्यावेळी आपण गुजरातला होतो, असा संतोषने दावा केला होता. मात्र, या संभाषणानुसार संतोष हा तेव्हा गुजरातला आला नव्हता, असे आढळून येत आहे. त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेSidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाPoliceपोलिसCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी