शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

Santosh Jagtap Murder Case: आरोपींना ८ दिवसांची पोलीस कोठडी, ३० तासांत केले होते जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 5:55 PM

संतोष जगताप याचा उरूळी कांचन हॉटेल सोनाईमध्ये गोळ्या झाडून खून केल्यानंतर फरार झालेल्या दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने ३० तासांच्या आत अटक केली होती

लोणी काळभोर :  दौंड तालुक्यातील राहू येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी संतोष जगताप याचा उरूळी कांचन हॉटेल सोनाईमध्ये गोळ्या झाडून खून केल्यानंतर फरार झालेल्या दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने ३० तासांच्या आत अटक केली होती. दोघे फरार झाल्यानंतर इंदारपूर येथील पळसदेव गावातील शेतात लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना जेरबंद करण्यात आले होते. त्यांना न्यायदंडाधिकारी यांनी आठ दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन गोरख मिसाळ, (वय २९, रा. दत्तवाडी, उरळी कांचन ) व महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २६, रा. जूनी तांबेवस्ती, दत्तवाडी, उरळी कांचन, ता. हवेली ) या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ शाखेच्या पथकाने इंदापूर परिसरातून अटक केली होती. लोणी काळभोर पोलीसांनी दोघांना सोमवार २५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले होते. यानुसार आरोपी व सरकारी वकील यांच्यात चर्चा झाली व त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांची बाजू ऐकून वरील दोन्ही आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आदलिंगे याच्यावर एक खुनाचा गुन्हा आणि एक खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे, तर मिसाळ याच्यावर २ आर्म ऍक्टचे गुन्हे दाखल आहेत. संतोष जगताप याच्यावर एक दुहरी हत्येबरोबर आणखी एक खुनाचा गुन्हा दाखल होता. या दोन्ही गुन्ह्यात जगताप जामिनावर बाहेर होता.

पाठलाग होत असल्याचा आला होता संशय

संतोष जगताप याने शुक्रवारी (दि. २२) रोजी केडगाव येथील एका दुकानाचे उदघाटन केल्यानंतर तो त्याच्या गाडीतून दुपारी उरूळी कांचनच्या दिशेने येत असताना आपला कोणीतरी पाठलाग करत असल्याची चाहूल त्याला लागली होती. याच दरम्यान दुपारी संतोष जगताप आणि त्याचे साथीदार उरूळी कांचन येथील हॉटेल सोनाई मध्ये जेवण्यासाठी थांबले. हल्ला होण्याच्या भितीपोटी हॉटेलमध्ये न बसता तो टेरेसवर जेवण करायला बसला होता. त्यावेळी त्याने मुख्य शटर बंद केले. जेवण करुन खाली आल्यानंतर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्याचा खून केला. यावेळी दोन गटात फायरिंग झाले त्यामध्ये स्वागत खैरे या सराईताचा देखील खून झाला. तर जगतापचा अंगरक्षक शैलेंद्रसिंग रामबहाद्दूर सिंग गंभीर हा गंभीर जखमी झाला.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू