लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट ग्राम योजनेचे पुरस्कार जाहीर झाले आहे. गेल्या दोन वर्षांचे पुरस्कार जाहीर झाले असून १०१९चा स्मार्ट ग्राम पुरस्कार इंदापूर तालुक्यातील सपकळवाडीला तर २०२० चा पुरस्कार मावळ तालुक्यातील भोयर ग्रामपंचायतीला मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली. आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी पात्र ठरली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या गावांचा गौरव होणार आहे.
स्मार्ट ग्राम ग्रामपंयातत योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या गावांना ५० लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. आंबेगाव तालुक्यातील भराडी कानसे, बारामती तालुक्यातील गुणवडी व सायबाचीवाडी, भोर तालुक्यातील रायरी व ससेवाडी, दौंड तालुक्यातील हातवळण व खुटबाव, हवेली तालुक्यातील मालखेड न्यू कोपरे, इंदापूर तालुक्यातील सपकाळवाडी व कांदलगाव, जुन्नर तालुक्यातील उंडेखडक व मांजरवाडी, खेड तालुक्यातील वेताळे व सिद्धेगव्हान, मावळ तालुक्यातील दिवड व भोयरे, मुळशी तालुक्यातील भुकुंम व पिरंगुट, पुरंदर तालुक्यातील पांगारी व भिवरी, शिरूर तालुक्यातील न्हावरा व वडगाव रासाई, वेल्हा तालुक्यातील कोळंबी व घोल ही गावे स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत.
चौकट
सुंदर गाव पुरस्कारासाठी पात्र ठरलेली गावे
आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव, बारामती तालुक्यातील काटेवाडी, भोर तालुक्यातील बारे बुद्रुक, दौंड तालुक्यातील भांडगाव, हवेली तालुक्यातील बाडेबोल्हाई, इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी, जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी, खेड तालुक्यातील वराळे, मावळ तालुक्यातील टाकवे खुर्द, मुळशी तालुक्यातील माण, पुरंदर तालुक्यातील पानवडी, शिरूर तालुक्यातील पिंपळगाव खालसा, तर वेल्हा तालक्यातील दापोडे ही गावे पात्र ठरली आहेत.