नोव्हेंबर - २७, ३०
डिसेंबर - ७, ८, ९ आणि १२
---------------------------------------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जाणारी खबरदारी
मंगल कार्यालये, हॉल, सभागृह सँनिटाईज केली जात आहेत. वधू-वर पक्षाकडील मंडळींना मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यालयात प्रवेश केल्यानंतर शारीरिक तापमान मोजले जाते. तसेच ५० खुर्च्या केवळ लांब लांब नव्हे तर दोन खुर्च्यांमध्ये एक लाल खुर्ची ठेवली जाते. त्यावर कुणी बसू नये असे सांगितले जाते. केटरिंगमध्ये भाज्या निर्जंतुक करण्याचे रसायन वापरले जाते. विवाह सोहळ्याला येणाऱ्यांची यादी दोन दिवस आधी पत्यासहित मागविली जाते.
-----------------------------------------------
आमच्याकडे नोव्हेंबर-डिसेंबर साठी विवाहाकरिता बुकिंग झालेले आहे आणि विचारणा देखील होत आहे. शासनाच्या नियमानुसार ५० लोकांच्याच उपस्थितीत लग्नकार्याची अनुमती आहे. काही जणांकडून अतिरिक्त मंडळी बोलविण्याचा आग्रह धरला जातो मात्र आम्ही त्यांना नकार देतो. व्यवसायापेक्षाही लोकांचे आरोग्य आमच्यासाठी अधिक महत्वाचे आहे.
- प्रसाद दातार, प्रतिज्ञा मंगल कार्यालय
----------------------------------------------
दिवाळीनंतर साधारपणे लग्नाचे मुहूर्त असतात. त्यानुसार यंदाही आमच्याकडे बुकींग होत आहे. मात्र कोरोनामुळे पाचपैकी तीन बुकिंग रद्द होत आहेत. लोकांमध्ये कोरोनाची भीती कायम आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा बुकिंग कमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वोतोपरी खबरदारी घेऊनच सर्व सेवा देत आहोत.
- पांडुरंग सप्रे, कोहिनूर मंगल कार्यालय
-----------------------------------------------