सुषमा नेहरकर- शिंदे पुणे : मराठा आरक्षणावरून वाद सुरू असताना , मराठी समाजाच्या हितासाठी सुरू झालेल्या सारथी संस्था देखील ओढून ताणून सुरू आहे. शासनाच्या आदेशामुळे सारथी संस्थेतील तब्बल २५ -३० कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे सध्या केवळ ७ कर्मचाऱ्यांवर संस्थेचा डोलारा उभा आहे. परंतु कर्मचारी कपातीमुळे संस्थेतील अनेक महत्त्वाचे विभाग बंद पडले आहेत. मराठी समाजातील तरुण मुला-मुलींच्या हितासाठी बार्टी, यशदा सारख्या संस्थांच्या धर्तीवर तत्कालीन सरकारने ‘सारथी’ या स्वयत्त संस्थेची स्थापन केली होती. परंतु राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ‘सारथी’ संस्थेची स्वयत्ता काढून घेण्यात आली. त्यानंतर हा प्रश्न चांगलाच गाजत आहे. महाआघाडी शासनाने सारथी संस्थेची स्वयत्ता तर काढून घेतलीच, परंतु संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील 90 टक्के कपात केली. सारथी संस्था सुरू होऊन एक -दीड वर्षेच झाले असले तरी मराठा समाजातील तरुण-तरुणींसाठी अनेक प्रकल्प सुरू केले होते. सारथी संस्थेच स्वतंत्र युपीएससी-एमपीएसी कक्ष, संशोधन कक्ष, ग्रंथालयासह अनेक विभाग सध्या कर्मचारी अभावी बंद पडले आहे. यामध्ये मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थितीची वस्तुनिष्ठ आकडेवारी गोळा करण्याचे काम देखील संस्थेमार्फत सुरू होते. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण कायम ठेवण्यासाठी या आकडेवारीचा शासनाला खूप उपयोग झाला असता,पण हा प्रकल्प देखील बंद पडला आहे. ----- संस्थेचे पन्नास कोटीचे बजेट आणले १५ कोटींवर सारथी संस्थेच्या वतीने मराठा समाजातील मुला-मुलींसाठी सीएम फेलोशिप, छत्रपती शाहूमहाराज फेलोशिप, युपीएसीसी, एमपीएससीसाठी क्लास फी व दिल्लीमध्ये मोफत प्रशिक्षण देण्यात येत होते. संस्थेला केवळ फेलोशिपसाठी दर वर्षी २४-५० कोटींचा निधी लागतोय. पण सध्या कोरोना आणि आर्थिक अडचण सांगत शासनाने संस्थेच्या ५० कोटींच्या निधीत कपात करून थेट १५ कोटीवर आणला आहे.
'सारथी' संस्थेचा डोलारा केवळ ७ कर्मचाऱ्यांवर उभा; अनेक महत्त्वाचे प्रकल्पही कर्मचारी कपातीमुळे बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 1:22 PM
आरक्षणावरून वाद सुरू असताना, मराठा समाजाच्या हितासाठी सुरू झालेल्या सारथी संस्था देखील ओढून ताणून सुरू आहे.
ठळक मुद्देशासनाच्या आदेशामुळे सारथी संस्थेतील तब्बल २५ -३० कर्मचाऱ्यांची कपात संस्थेचे पन्नास कोटीचे बजेट आणले १५ कोटींवर