पुणे : महापालिका प्रस्तावित शिवसृष्टी झालीच पाहिजे, अशी मागणी करीत सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिवसृष्टीच साकारली. सत्ताधारी भाजपासह विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे या सदस्यांनी कोथरूड येथेच शिवसृष्टी व्हावी अशी मागणी केली.सायंकाळी साडेसातपर्यंत सुरू असलेल्या सभेत अनेक नगरसेवकांनी शिवसृष्टीला पाठिंबा दिला व याबाबत मेट्रो व्यवस्थापनाशीबोलून मार्ग काढावा असे सुचवले. अखेरीस महापौर मुक्ता टिळक यांनी मेट्रो व्यवस्थापन, महापालिका, पालकमंत्री व सर्व पक्षांचे नेते यांची संयुक्त बैठक आयोजित करून यावर सकारात्मक निर्णय होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.मेट्रोच्या नियोजित स्थानकामुळे त्यापूर्वीच महापालिकेने प्रस्तावित केलेल्या कोथरूड येथील शिवसृष्टीसमोर ती होणार की नाही, असे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, माजी उपमहापौर दीपक मानकर व अन्य नगरसेवकांनी यावर पुढाकार घेत महापौरांना विशेष सभेचे आयोजन करणे भाग पाडले. सभेत सर्वच नगरसेवकांनी शिवसृष्टीच्या बाजूने मत व्यक्त केले. पाहिजे तर मेट्रो स्थानकाची जागा बदला, शक्य असे तर तिथेच मेट्रो स्थान भूमिगत करा, पण शिवसृष्टी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.वैशाली मराठे, योगेश ससाणे, गोपाळ चिंतल, सुनील टिंगरे, अमोल बालवडकर, महेंद्र पठारे, विशाल धनावडे, सुशील मेंगडे, हाजी गफूर पठाण, धीरज घाटे, नंदा लोणकर, सुनील कांबळे, भय्यासाहेब जाधव, अल्पना वर्पे, प्रमोद भानगिरे, महेश वाबळे, राणी भोसले, युवराज बेलदरे, प्रवीण चोरबेले, आरती कोंढरे, वर्षा तापकीर, धनराज घोगरे, संजय घुले, रघु गौडा, मनीषा लडकत, वृषाली चौधरी, अजय खेडेकर, बाळा ओसवाल, अविनाश साळवे, रेश्मा भोसले, शंकर पवार, माधुरी सहस्रबुद्धे, रुपाली धाडवे, मंजूश्री खर्डेकर, सुनीता वाडेकर यांचीही भाषणे झाली.४महापौर मुक्ता टिळक यांनी नगरसेवकांनी शिवसृष्टीसाठी म्हणून महापौरांच्या आसनासमोर येऊन घोषणा द्याव्यात याबद्दल नाराजी व्यक्त केली. शिवसृष्टीला कोणाचाही विरोध नाही; मात्र यासंदर्भात मेट्रोचा आराखडा काय आहे, त्यात काय म्हटले आहे, याचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी महामेट्रो, महापालिका, शहरातील सर्वपक्षीय नेते, पालकमंत्री गिरीश बापट यांची संयुक्त बैठक घेऊ व त्यावर मार्ग काढू, असे महापौरांनी सांगितले.
सर्वसाधारण सभेतच शिवसृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 6:14 AM