आज सरपंच व उपसरपंच पदा करिता झालेल्या निवडीमध्ये सरपंच पदा करिता सारिका संजय चोरमले व उपसरपंच पदाकरिता सुखदेव दादा बरकडे यांचा एक मात्र अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कुंजीर यांनी त्यांना विजयी घोषित केले. यावेळी सारिका प्रदीप बरकडे, दत्तात्रय बरकडे, ज्योती बरकडे, कलुबाई बरकडे, शितल चोरमले सदस्य उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार माजी सरपंच सविता बरकडे व राजेंद्र बरकडे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी पुरंदर भाजपा उपाध्यक्ष दादा बरकडे माजी सरपंच सविता बरकडे, भागूजी बरकडे, भैरवनाथ सोसायटी चेअरमन पांडुरंग बरकडे, बापूराव बरकडे, विठ्ठल बरकडे, संजय चोरमले, नवनाथ चोरमले, सोमनाथ चोरमले, केशव चोरमले, माजी उपसरपंच दिलीप बरकडे, रामदास काळे, साहेबराव बरकडे, गणपत चोरमले, दिपक बरकडे, माणिक चोरमले, आप्पा काळे प्रदीप बरकडे, आप्पा चोरमले, सतीश काळे, भरत बरकडे, पोलीस पाटील सुजाता बरकडे, ग्रामसेवक सीमा गावडे, तलाठी शितल खरात व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.