शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

पाचशे फूट खोल दरीतून काढले बाहेर; महिनाभरापासून बेपत्ता सर्जा दिवाळीला शेतकऱ्याच्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 5:30 PM

सर्जा बैलापर्यंत जाण्यासाठी रेस्क्यू टीमला लागले ५ तास

पुणे : खोल दरीत तो पडला होता. पायाला लागल्याने तिथून कुठेच जाता येत नव्हते. कोणाला तरी तो दिसला आणि मग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी त्याला सुखरूप तिथून बाहेर काढले. आता तो सर्जा बरा होत असून, दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकरी राजाला त्याचा हा सर्जा परत मिळाला आहे. म्हणून त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. ५०० फूट खोल दरीतून वर काढायला तब्बल ५ तास लागले.

ही गोष्ट आहे सर्जा नावाच्या बैलाची. पाबे घाटातील रांजणे गावामधील एका शेतकऱ्याचा तो बैल महिनाभरापासून बेपत्ता होता. मालकाने तो जिवंत असल्याची आशा ठेवली नव्हती; पण दिवाळीच्या मुहूर्तावर तो सर्जा परत आपल्या मालकाकडे आला आहे.

पुण्यातील रेस्क्यू टीमला एक बैल पाबे घाटातील खोल दरीत असल्याचा काॅल आला. मग रेस्क्यू टीम लगेच रवाना झाली. खोल दरीत सर्जा असल्याने त्याला वर आणणे एक दिव्यच होते. मग तिथेच सुरुवातीला उपचार सुरू केले. कारण सर्जाच्या अंगावर जखमा होत्या. पाय लंगडत होता. तिथेच त्याला सलाइन लावले. त्यानंतर स्ट्रेचर आणून त्यावर एका पठारावर त्याला हलवले. तिथे सर्जाला थोडं तणावमुक्त होऊ दिले. यानंतर रेस्क्यू टीमने त्याला रांजणे गावात आणले आणि तिथेच उपचार केले. आता सर्जा बरा होत आहे. रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी दिवाळीत घरची दिवाळी दूर ठेवत त्या सर्जाला दरीतून बाहेर काढून खरीखुरी आनंदाची दिवाळी साजरी केली.

महिनाभर बैल बेपत्ता

रांजणे गावातील एका शेतकऱ्याचा सर्जा नावाचा बैल आहे. तो काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला. मालकाने त्याचा खूप शोध घेतला, पण कुठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे मालकाने सर्जाची आशा सोडून दिली होती.

असे केले रेस्क्यू

सर्जा बैलापर्यंत जाण्यासाठी रेस्क्यू टीमला ५ तास लागले. रात्री तिथून वर आणणे शक्य नसल्याने रात्रभर तिथेच त्याला सलाईन लावले. थंडीत कुडकुडत रेस्क्यूची टीम तिथे कार्यरत होती. त्यानंतर सकाळी बैलाला वर आणण्यासाठी सहा तास लागले.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022FarmerशेतकरीSocialसामाजिक