याबाबत मिळालेली माहिती अशी की, सरपंच शरद गोरख काळाने (सध्या रा. फुरसुंगी ता. हवेली) यांनी राजेंद्र दावलकर (रा. जेजुरी) यांच्याशी जमीनविक्रीचा व्यवहार केला होता. या व्यवहारापोटी काळाने यांनी त्यांना अडीच कोटी रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र तो धनादेश न वठल्याने दावलकर यांनी सासवड न्यायालयात १३८, ४२० अन्वये फसवणुकीचा दावा दाखल केला होता. दाव्यानुसार न्यायालयाने दाव्यास हजर राहण्यासंबंधी नोटिसा पाठवूनही हजर न राहिल्याने सासवडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एच. तिखे यांनी शरद काळाने यांस फरार घोषित करीत त्यांचेविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. धालेवाडी हे गाव आदर्श गाव पुरस्कारप्राप्त असून, या गावच्या विद्यमान सरपंचाविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट निघाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
धालेवाडीचे सरपंच न्यायालयाकडून फरार घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:10 AM