यवतमधील कब्रस्तानमध्ये रात्रीच्या वेळी अंत्यविधी करताना अंधार असल्यास मोठी अडचण होत होती. यामुळे तेथे दहा एलईडी दिवे याचबरोबर एक हायमास्ट लॅम्प बसविण्यात आला आहे.येथे पाण्याची टाकी व नमाज पठाण ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम मंजूर असून लवकरच सुरू केले जाणार आहे.तसेच स्वछतागृह व रस्त्याचे काम लवकरच केले जाईल. असे आश्वासन यावेळी सरपंच समीर दोरगे यांनी दिले.
सत्कार प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी , राजू तांबोळी , अब्रार शेख, जावेद बेग, इम्रान शेख , फय्याज तांबोळी, अल्ताफ शेख, मोसीन तांबोळी , अरविंद दोरगे , मुसा शेख , सोहेल तांबोळी, अरबाज मोगल, साहिल शेख, अरबाज तांबोळी, आलीम शेख आदी उपस्थित होते.
०८ यवत
यवत दफनभूमीत विविध विकासकामे मार्गी लावल्याबद्दल सरपंच समीर दोरगे, गणेश शेळके यांचा सत्कार करताना मुस्लीम युवक.