सासवड : सासवड पोलीस ठाण्याला कुंभारवळण गावचे विद्यमान सरपंच अमोल दत्तात्रय कामठे, सासवड येथील सावकार अनिकेत संजय जगताप, सागर शिवाजी जगताप यांच्याविरुद्ध जमीन गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवायेथील रहिवासी फिर्यादीकुमारी आकांक्षा संजय जैनयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील तिघा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कुभांरवळणचे विद्यमान सरपंच अमोल कामठे, सावकार अनिकेत जगताप, सागर जगताप यांनी जैन कुटुंबीयांना सासवडमधील सर्व्हे नं. ९३ मधील ३० गुंठे जागेच्या व्यवहारापोटी दि. १३-१०-२०१४ पासून आजतागायत वेळोवेळी रोख एनईएफटीद्वारे रक्कम रुपये नऊ लाख पासष्ट हजारविसार पावतीपोटी घेतले होते.परंतु ही जागा खरेदी न देता केवळ स्वत:च्या फायद्याकरिता संगनमत करून व्यवहार पूर्ण न करता फसवणूक केली आहे.या गुन्ह्याची फिर्याद मागच्यावर्षी करण्यात आली होती. यानंतर आरोपी फरार होते. यादरम्यान आरोपींनी जामीन मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. सरकारीवकिलांना भेटून आरोपींचाजामीन सेशन कोर्टाने नामंजूरकेल्याने या आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
सरपंचांसह सावकारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 4:26 AM