खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी परिसरात रुणवाहिका नसल्याने सामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. गोरगरीब लोकांची समस्या होऊ नये आणि रुग्णांची सेवा घडावी या उद्देशाने सरपंच संभाजी घारे यांनी स्व स्वर्चातून रुग्णवाहिका दिली. आमदार मोहिते व माजी खासदार आढळराव यांनी सरपंच संभाजी आबा घारे यांचे मनोगतात कौतुक केले. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर, आशा वर्कर व कोरोनायोद्ध्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, अतुल देशमुख, स्व. सुरेश गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, पंचायत समिती सदस्या ज्योती अरगडे, पिंपरी-चिंचवड माजी महापौर राहुल जाधव, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, समर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह शिंदे पाटील, खेड तालुका शिवसेनाप्रमुख रामदास धनवटे, बापूसाहेब थिटे, बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, मयूर मोहिते, राहुल तांबे पाटील, प्रकाश वाडेकर, अशोक राक्षे, सचिन नवले, उपसरपंच राहुल कदम, माजी सरपंच सुरेश डुंबरे, हिरामण खेसे, संतोष सातपुते, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, भाऊसाहेब होरे, राजेश कान्हुरकर, देवराम सातपुते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम कराळे यांनी केले.
सरपंचाने दिली गावासाठी रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:11 AM