कोरेगाव भीमा: जिल्हा नियोजन मंडळावर सरपंच प्रतिनिधी नेमावा, कोरोनाकाळात निधन झालेल्या सरपंचांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करावी, ग्रामपंचायतीसाठी शासनाने कर सल्ल्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीऐवजी स्थानिक कर सल्लागार यांच्याकडून ती कामे करून घ्यावी यांसह विविध मागण्यांचे निवेदन सणसवाडीच्या सरपंच सुनंदा दरेकर व ग्रामपंचायत सदस्या स्नेहल भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
दरेकर आणि भुजबळ यांनी मंत्रालयात अजित पवार यांनी भेट घेऊन विकासकामांबाबत चर्चा केली. या वेळी अजित पवार यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राज्य शासनाने नियुक्त केलेली जयस्तुते मॅनेजमेंट कंपनीची निवड रद्द करावी, पंतप्रधान आवास योजनेतील ड यादीच्या घरकुलाचे सर्वेक्षण होऊन मंजूर करावीत, संगणकचालक हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी समजण्यात यावा व त्यांना नियुक्त करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना असावेत सीएससी कंपनीकडून ग्रामपंचायत आणि संगणकचालक या दोघांची लूट होत असून हे तत्काळ थांबवावे, गावातील पथदिव्यांची बिले पूर्वीप्रमाणे शासनस्तरावरून भरावी, कोरोनाकाळात ग्रामपंचायतीला वसुली नसल्याने वीज कनेक्शन तोडल्याने गावे अंधारात, तर पाणीपुरवठ्याची बिले भरणे शक्य नसल्याने शासनसतरावरून तरतूद करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
१६ कोरेगाव भीमा
अजित पवार यांना विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भेट देताना सुनंदा दरेकर, स्नेहल भुजबळ.
160921\1749-img-20210916-wa0009.jpg
फोटो ओळ - उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विठ्ठल रुख्मिणी मूर्ती भेट देताना सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर व सदस्या स्नेहल राजेश भुजबळ