शिरगाव (पुणे) : किरकोळ वादातून सांगवडे येथील सरपंच दीपाली लिमण यांचे पती नवनाथ अर्जुन लिमण (३२, रा. सांगवडे) यांचा धारदार शस्त्राने वार करून रविवारी पहाटे खून करण्यात आला. नवनाथ यांचे आरोपीशी चार दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता. गेल्या आठवड्यापासून गावात हरिनाम सप्ताह सुरू होता. भजन संपताच गावकरी घरी जात असताना नवनाथ सहकाऱ्याबरोबर मंदिराजवळ बसले असताना चार ते पाच आरोपी जीपमधून आले. त्यांनी नवनाथ यांच्यावर हल्ला चढवला व पसार झाले. यात गंभीर जखमी झालेल्या नवनाथ यांना ग्रामस्थांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (प्रतिनिधी)
सरपंचाच्या पतीचा खून
By admin | Published: April 24, 2017 3:21 AM