शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

डॉ.अजय चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीचा ससूनमध्ये डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निषेध  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 5:51 PM

ससून रुग्णालयातील गेल्या काही दिवसातील चढता आलेख बदलीस कारणीभूत असल्याची चर्चा

ठळक मुद्देदैनंदिन काम बंद न ठेवता निषेध म्हणून अनेकांनी काळ्या फिती लावून काम डॉ. चंदनवाले यांची गुरूवारी शासनाने तडकाफडकी बदली केल्यानंतर रुग्णालयातील अनेकांना धक्का

पुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या बदलीचा अनेक डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एकत्रित येत निषेध केला. तसेच त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे बदली रद्दची मागणीही केली. दैनंदिन काम बंद न ठेवता निषेध म्हणून अनेकांनी काळ्या फिती लावून काम केले.डॉ. चंदनवाले यांची गुरूवारी शासनाने तडकाफडकी बदली केल्यानंतर रुग्णालयातील अनेकांना धक्का बसला. ससूनमधील नवीन इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा दिला आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण तसेच मृतांचा आकडाही वाढत आहे. यापार्श्वभुमीवर ही बदली झाल्याने रुग्णालयातील काहींनी नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी सकाळी पदभार सोडून जाताना महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडन्ट डॉक्टर्स (मार्ड)चे काही सदस्य, काही वरिष्ठ डॉक्टर्स, अधिकारी, परिचारिका तसेच कर्मचाऱ्यांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर एकत्रित जमा झाले होते. यावेळी त्यांनी चंदनवाले सरांना पदभार सोडून न जाण्याची विनंती केली. तसेच बदलीचा निषेधही नोंदविला. पण चंदनवाले यांनी सर्वांना पुन्हा कामावर परतण्याचे आवाहन केले.डॉ. चंदनवाले यांची बदली रद्द करण्याची मागणी करणारे सुमारे १२५ जणांच्या सह्यांचे पत्र वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव यांना पाठविण्यात आले. तसेच शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेऊन त्यांनाही मागणीचे निवेदन दिले. डॉ. चंदनवाले यांची अचानक बदली झाल्याने अनेकांचे मनोबल खचले आहे. सद्यस्थितीत नवीन व्यक्तीकडून नियोजन, व्यवस्थापन सुरू झाल्यास गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करायला हवी, असे मार्ड डॉक्टरांनी सांगितले.-------------अधिष्ठातापदी डॉ. शिंत्रेडॉ. चंदनवाले यांनी शुक्रवारी सकाळी रुग्णालयातील अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे अधिष्ठाता पदाची सुत्रे सोपविली. त्यानंतर ते वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या मुंबईतील कार्यालयाकडे रवाना झाले. रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे हे वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याने डॉ. शिंत्रे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलdoctorडॉक्टरTransferबदलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू