Ajit Pawar: 'पुण्यातील ससून आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय हे कोरोना संकटात प्रमुख आधारस्तंभ बनले'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 06:06 PM2021-06-23T18:06:29+5:302021-06-23T18:11:47+5:30

बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचक वक्तव्य

"Sassoon and BJ Medical College in Pune became good work in the Corona crisis" | Ajit Pawar: 'पुण्यातील ससून आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय हे कोरोना संकटात प्रमुख आधारस्तंभ बनले'

Ajit Pawar: 'पुण्यातील ससून आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय हे कोरोना संकटात प्रमुख आधारस्तंभ बनले'

googlenewsNext
ठळक मुद्देबी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णसेवेसह कोरोना काळात बजावलेल्या कर्तव्यनिष्ठेची इतिहासात नोंद इतिहासात

पुणे: पुण्यातील ससून रुग्णालयाच्या संलग्न बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिकून अनेक विद्यार्थी तज्ज्ञ डॉक्टर म्हणून रुग्णांची देश-विदेशात सेवा करत आहेत. ससून रुग्णालयात राष्ट्रपिता महात्मा गांधींसह अनेक मान्यवरांनी उपचार घेतले आहेत. गेल्या दिड वर्षापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटातही अनेकांनी या रुग्णालयामध्ये उपचार घेतले आणि ते बरे झाले. कोरोनाच्या संकटात ससून रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय हे आपले प्रमुख आधारस्तंभ बनले आहेत. असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

त्यामुळे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णसेवेसह कोरोना काळात बजावलेल्या कर्तव्यनिष्ठेची नोंद इतिहासात होईल. असेही ते यावेळी म्हणाले आहेत.  

पुण्याच्या बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार ऑनलाईन सहभागी झाले होते. याप्रसंगी ते बोलत होते. 

ससून आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय या शासकीय संस्था आहेत. संस्था रुग्णसेवा आणि समाजसेवा या ध्येयाने काम करतात. अशा प्रकारे कौतुक करत ते म्हणाले,  कोरोनाकाळात अनेक रुग्ण उपचारासाठी पहिल्यांदा खाजगी रुग्णालयात दाखल झाले, मात्र चांगले उपचार मिळावेत, यासाठी ते ससून रुग्णालयात भरती होत होते. कोणत्याही खाजगी हॉस्पिटलपेक्षा चांगली अत्याधुनिक उपचार यंत्रणा आणि रुग्णसेवा ससूनमध्ये मिळते, हा लोकांचा विश्वास आहे. 

महाविद्यालयाने डॉक्टर घडवण्याचे कार्य कायम सुरु ठेवावे 

अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत इथे यायचे, त्यातल्या अनेकांचे प्राण आपण वाचवले आहेत. अत्याधुनिक उपचार यंत्रणा, दर्जेदार रुग्णसेवा, समाजासाठी तज्ज्ञ डॉक्टर निर्माण करण्याचे काम महाविद्यालयाने कायम सुरु ठेवावे असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. 

यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आमदार चेतन तुपे, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, यशदाचे महासंचालक तथा ससून रुग्णालयाचे समन्वयक एस. चोक्कलिंगम, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. 

Web Title: "Sassoon and BJ Medical College in Pune became good work in the Corona crisis"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.