पुणे - माणुसकी हरवली का? असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. अपघातात एक पाय गमावलेला रुग्ण उपचारासाठी ससूनमध्ये दाखल झाला होता. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले, मात्र रुग्णालयाकडून व्हिलचेअर तर दूरच, कुणी मदतीसुद्धा पुढे आले नाही. त्यामुळे रुग्णाला स्वतःच जमिनीवर सरपटत रुग्णालयाच्या वार्डमधून बाहेर पडावे लागले. याचा हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.याआधीच आर्थिक अडचणींमुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, ससून रुग्णालयातील ही घटना आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाचे आणि अमानवतेचे चित्र पुन्हा समोर आणते.
माणुसकी हरवली..! ससून रुग्णालयात पाय गमावलेला रुग्ण व्हीलचेअर न मिळाल्याने सरपटत गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 19:18 IST