पुणे : ससून रुग्णालयामध्ये नवीन अकरा मजली इमारत झाली. त्यामुळे तेथे ८०० बेड अतिरिक्त वाढले. आता जुन्या व नव्या इमारतीमध्ये मिळून बेड संख्या १२९६ वरून १८०० झाली व रुग्णसंख्याही वाढली आहे. परंतू, त्या तुलनेत मनृष्यबळ मात्र तितकेच आहे. सद्यस्थितीत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग एक ते चार या संवर्गाची २२५ तर ससून रुग्णालयात याच संवर्गाची ६४४ पदे रिक्त असल्याने त्याचा फटका रुग्णसेवेला बसत आहे.
ससून रुग्णालयात दरराेज दीड ते दाेन हजार रुग्ण ओपीडीमध्ये येतात. त्यापैकी दरदिवशी दीडशे ते दाेनशे रुग्ण शस्त्रक्रिया, उपचार यासाठी ॲडमिट हाेतात. तर तितकेच रुग्ण उपचार हाेउनही बाहेर पडतात. तसेच दरराेज ३० ते ४० माेठया शस्त्रक्रिया आणि १०० ते १५० किरकाेळ प्राेसीजर्स किंवा शस्त्रक्रिया हाेतात. रुग्णांची संख्या जास्त असल्याने मणुष्यबळ मात्र, कमी पडत आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून सर्वोपचार रुग्णालयाला शुक्रवारी भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, मनुष्यबळ, औषधपुरवठा या बाबतची माहिती घेतली. यानंतर ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी एक अहवाल तयार करून विभागीय आयुक्त राव यांच्याकडे शनिवारी पाठविला.
रेफरवर हवा अंकुश
ससून रुग्णालय हे टर्शरी केअर ही आराेग्य सेवा देणारे रुग्णालय आहे. म्हणजे माेठया उपचारासाठीच येथे रुग्ण दाखल हाेणे गरजेचे आहे. परंतू, ग्रामीण भागातील इतर सरकारी रुग्णालये, महापालिका क्षेत्रातील रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयातून काम ढकलण्यासाठी, गरज नसताना साध्या - साध्या उपचारासाठी ससूनला पाठवले जातात. त्यामुळे येथील रुग्णसेवेचे ओझे विनाकारण वाढते. म्हणून या रेफरलवर काहीतरी अंकुश यायला हवा.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील मनुष्यबळ
संवर्ग - मंजूर - भरलेली - रिक्त
१ : १३८ : १०९ : २९२ : १४८ : १२८ : २०
३ : २६० : १८१ : ७९४ : १७१ : ७४ : ९७
एकूण : ७१७ : ४९२ : २२५
ससून रुग्णालयातील मनुष्यबळ
संवर्ग - मंजूर - भरलेली - रिक्त
१ ते २ : १७२ : ७८ : ९४३ : २२९ : १६४ : ६५
नर्सिंग : ११०१ : ९९७ : १०४४ : ८३४ : ४५३ : ३८१
एकूण : २३३६ : १६९२ : ६४४