पुणे : ससून रुग्णालयाच्या खुर्चीवरून सध्याचे अधिष्ठाता (डीन) डाॅ.संजीव ठाकूर आणि आधीचे अधिष्ठाता डाॅ.विनायक काळे यांच्यातील संघर्ष टाेकाला पाेहोचला आहे. ससूनच्या डीन पदावर काेणाचा हक्क, याबाबत उच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. मात्र, दाेन्ही डीनच्या भांडणात ससूनमध्ये येणारे रुग्ण भरडले जात असल्याचे चित्र सध्या आहे. मात्र, याच वेळी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कैद्यांवर मात्र, महिनोंमहिने उपचार होतात, त्यांना हव्या त्या सुविधा पुरविल्या जातात, हा विरोधाभासही आहे.
ससून रुग्णालयात एखाद्या सामान्य रुग्णाला एक्स-रे काढायचा असला, तर अर्धा दिवस रांगेत थांबावे लागते. पूर्ण तपासण्या करून ॲडमिट व्हायचे असेल, तर दिवस जाताे, परंतु विराेधाभास म्हणजे गंभीर गुन्ह्यात दाखल कैदी रुग्णांवर महिनाेंमहिने उपचार हाेतात. त्यांना हव्या त्या सुविधा पुरविल्या जातात. या घटनांमधून ससून रुग्णालयाकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकाेन बदलत आहे. या घटनांकडे वरिष्ठांचे लक्ष नाही का, असा प्रश्न उपस्थित हाेताे.
डाॅ.ठाकूर ससूनचे अधिष्ठाता जानेवारी, २०२३ मध्ये हाेण्यापूर्वी डाॅ.विनायक काळे ससूनचे अधिष्ठाता हाेते. डाॅ.काळे यांना येऊन दीड वर्ष हाेत नाही, ताेच सरकारने त्यांची बदली महाराष्ट्र मानसिक आराेग्य संस्थेच्या संचालकपदावर केली, तर त्यांच्या जागी म्हणजेच डाॅ.ठाकूर रुजू झाले. मात्र, वेळेआधीच बदली झाल्याने व्यथित झालेले डाॅ.काळे यांनी नवीन ठिकाणी रुजू न हाेता, ते शासन निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) गेले.
‘मॅट’ने सहा महिन्यांनी, जुलैमध्ये डाॅ.काळे यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर, डाॅ.काळे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ससूनच्या अधिष्ठाता पदाची ऑर्डर येण्याची प्रतीक्षा करीत हाेते, परंतु डाॅ.ठाकूर यांनी ‘मॅट’च्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर अद्याप निर्णय बाकी आहे.
‘झीरो प्रिस्क्रिप्शन’ची अंमलबजावणी, मात्र मूलभूत उपचारांसाठीच संघर्ष-
दरम्यान, डाॅ.ठाकूर डीन झाल्यानंतर त्यांनी औषधांच्या खरेदीकडे लक्ष देऊन ‘झीराे प्रिस्क्रिप्शन’ची अंमलबजावणी काही दिवस केली, परंतु नंतर ती बारगळली, तसेच त्यांनी लठ्ठपणाच्या शस्त्रक्रिया सुरू केल्या. राेबाेटिक शस्त्रक्रिया करण्याचेही त्यांचा मानस आहे. असे असले, तरी रुग्णांना मूलभूत उपचारच मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र दिसते, तसेच पेशंट दाखल असलेल्या वॉर्डमध्ये वरिष्ठ डाॅक्टरांचे राउंडही हाेत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, डाॅ.विनायक काळे हेही त्यांचे ससूनचे डीनचे पद साेडायला तयार नाहीत. बदली झाल्यावर नवीन पदभार न घेता ते सध्या ते मुंबईत आहेत, तर डाॅ.ठाकूरही त्यांना मुंबईतच ठेवण्यासाठी माेर्चेबांधणी करून तयार आहेत.
डाॅ. ठाकूर डीन झाल्यानंतर त्यांनी औषधखरेदीकडे लक्ष देत ‘झिराे प्रिस्क्रिप्शन’ची अंमलबजावणी काही दिवस केली; परंतु, नंतर ती बारगळली. त्यांनी लठठपणाच्या शस्त्रक्रिया सुरू केल्या. तसेच, राेबाेटिक शस्त्रक्रिया करण्याचेही त्यांचा मानस आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांना मूलभूत उपचारच अद्याप मिळण्यासाठी संघर्ष करावा लागताे, असे दिसते. तसेच त्यांचा पेशंट उपचार सुरू असलेल्या वाॅर्डमध्ये वरिष्ठ डाॅक्टरांचे राउंडही हाेत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, डाॅ. विनायक काळे हेदेखील आधीचे ससूनचे डीनचे पद साेडायला तयार नाहीत. बदली झाल्यावर नवीन पदभार न घेता ते सध्या ते मुंबईत ठाण मांडून आहेत. डाॅ. ठाकूरदेखील त्यांना मुंबईतच ठेवण्यासाठी पूर्ण माेर्चेबांधणी करून तयार आहेत.
डीन पदात दडलेय काय ?
डाॅ. काळे आणि डाॅ. ठाकूर हे दाेन्ही वरिष्ठ डाॅक्टर ससूनचे डीनपद साेडायला तयार नाहीत, यावरून ससूनच्या डीन पदामध्ये दडलंय काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
ससून रुग्णालयात राेबाेटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, तसेच ससून रुग्णालयात एकाच वेळी १,५००हून अधिक रुग्ण उपचारांसाठी दाखल असतात. दरराेज दाेन हजार रुग्ण ओपीडीमध्ये येतात. सर्वांना चांगले उपचार देण्यात येतात.
- डाॅ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय.