सासवड येथील ग्रामीण रुग्णालय तसेच दिवे येथील शासकीय वसतिगृहात रुग्ण आहेत पण वाढती संख्या लक्षात घेता ही सेंटर अपुरी पडत आहेत खाजगी हॉस्पिटल मध्येही फार बेड नाहीत अशा वेळी अनेक रुग्ण घरातच विलगीकरणात रहात आहेत. कुटूंबातील सर्वजण पॉझिटिव्ह होत आहेत. पुणे येथे जाण्याची अनेकांची मानसिक तयारी नाही किंवा त्यांना शक्य होत नाही. अशावेळी सासवड शहरात सुसज्ज कोविड सेंटरची आवश्यकता आहे. अनेक नागरिकांची तशी मागणी आहे. मार्तंड देवस्थानने जेजुरी येथे कोविड सेंटर सुरु केले आहे. त्याच पद्धतीने पुरंदर मधील नारायणपूर देवस्थान, वीर देवस्थान, कानिफनाथ देवस्थान, सासवड नगर पालिका व काही सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन कोविद सेंटर सुरु करावी अशी अपेक्षा आहे.
सासवड येथील प्रशासन या बाबत काही उपाययोजना करीत असेल तर त्याची माहिती मिळणे आवश्यक आहे सध्या दररोज किती रुग्ण, कोणत्या गावचे रुग्ण एवढीच माहिती मिळते परंतु किती रुग्ण बरे झाले, किती मृत्यू झाले याची माहिती मिळणे आवश्यक आहे. सासवड शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहून नागरिक चिंतेत आहेत. कोविद लस घेण्याची संख्या वाढत आहे या सर्वाचा ताण आरोग्य विभागावर येत आहे .