सासवड : पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथील ४९८च्या गुन्ह्यातील दोन आरोपींना केसमधून बाहेर काढतो, तसेच या प्रकरणी सर्वतोपरी मदत करतो, असे सांगून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सासवड पोलीस ठाण्यामधील सहायक फौजदार कैलास केशव जेधे (वय ५६) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. सासवड पोलीस ठाण्यामध्ये आज (दि. २३) ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे व अप्पर अधीक्षक अर्जुन सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या पथकाने आज ही कारवाई केली. के. के. जेधे याच्या विरोधात १९८८च्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७/१३/१ ड अन्वये कारवाई करण्यात आली आहे. अशाच स्वरूपाचा प्रकार सासवड पोलीस ठाण्यामध्येच काही महिन्यांपूर्वी एका महिला पोलीस शिपायाने केला होता.
सासवडच्या सहायक फौजदाराला लाच घेताना अटक
By admin | Published: September 24, 2015 2:57 AM