मंगेश पांडे ल्ल पिंपरी
कार्तिकी यात्र म्हटले की अमावस्येच्या दिवशी देहूतील मुख्य देऊळवाडय़ातील भजनी मंडपात होणा:या कीर्तनाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. कीर्तनसेवेची ही परंपरा गेल्या तीन पिढय़ांपासून सातारकर कुटुंबीय अखंडपणो जपत आहे.
।।धन्य आजि दिन, दर्शन संतांचे।।
।।तया घरी नांदे दैवत पंढरीचे।।
या अभंगावर हे कीर्तन होते. कार्तिकी यात्रेनिमित्त देहू-आळंदीला मोठय़ाप्रमाणात भाविकांची गर्दी असते. ख:या अर्थाने नवमीपासून यात्रेला सुरुवात होते. काकडा आरती, महापूजा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम मुख्य देऊळवाडय़ात असतात. परंपरेप्रमाणो मानाच्या दिंडय़ा देहूत येऊन आपली सेवा रुजू करतात. कार्तिकी अमावस्येला होणा:या कीर्तनानंतर या यात्रेची सांगता होते.
या कीर्तनाला मुख्य देऊळवाडय़ातील भजनी मंडपात सकाळी सहालाच सुरुवात होते. सातारकर दिंडीकडे हे कीर्तन करण्याची परंपरा आहे. 1946 र्पयत दादामहाराज सातारकर यांनी कीर्तनसेवा दिली. 1946 ते 62 दरम्यान अप्पामहाराज सातारकर यांनी ही परंपरा जपली. तर 62 पासून अद्यापर्पयत गेली 52 वर्षापासून बाबामहाराज सातारकर अखंडपणो तुकोबांच्या चरणी ही सेवा देत आहेत.
वाढत्या वयोमानाने बाबामहाराजांना उभे राहणो शक्य होत नाही. त्यांच्या पायाची आणि छातीची शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र, राज्यात आणि राज्याबाहेरही बसून कीर्तन करणारे बाबामहाराज येथील भजनी मंडळातील परंपरा जपत वयाच्या 8क्व्या वर्षीही उभे राहूनच कीर्तन करत आहेत. तसेच बहुतेक कीर्तनं सायंकाळच्या वेळी असतात अथवा सप्ताहाच्या काल्याचे कीर्तन सकाळी नऊ, दहा वाजता सुरू होते. मात्र, सातारकर पहाटे सहालाच कीर्तनाला उभे राहतात. पूर्वी पहाटे सहा ते नऊ वाजेर्पयत भजनी मंडप रिकामा असायचा. यावेळेत कीर्तन करण्याच्या सूचना संस्थानने
सातारकर दिंडीकरांनी दिल्या होत्या. त्यावेळेपासून अमावस्येचे कीर्तन
पहाटे सहाला करण्याची पद्धत रूढ झाली.
तुकोबांच्या दारात कीर्तनसेवा करायला मिळणो हेच मोठं भाग्य आहे. भगवंताच्या दारात उभे राहिल्यानंतर ताकद मिळते. पायाचे आणि छातीचे ऑपरेशन झाले आहे. जास्त वेळ उभे न राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, परंपरा जपणोही गरजेचे आहे. कीर्तनाची परंपरा यापुढेही अखंडपणो जपणार आहे.- बाबामहाराज सातारकर