शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पुणे मेट्रोच्या प्रगतीबाबत कर्जदाते समाधानी; पर्यावरण संवर्धनाचेही कौतुक, केली संयुक्त पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 7:27 PM

मेट्रो प्रकल्पाला काहीशे कोटी रूपयांचे कर्ज अल्प व्याजदरात उपलब्ध करून देणाऱ्या परदेशी वित्तीय संस्थांनी या कामाच्या प्रगतीची संयुक्त पाहणी केली. कामाच्या गतीबाबत समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनासाठी राबवत असलेल्या विविध उपायांचे कौतुकईआयबीच्या या प्रकल्पाच्या भुयारी मार्गाचे काम, लिफ्ट आणि एस्कलेटर यासाठी देणार कर्ज

पुणे : मेट्रो प्रकल्पाला काहीशे कोटी रूपयांचे कर्ज अल्प व्याजदरात उपलब्ध करून देणाऱ्या परदेशी वित्तीय संस्थांनी या कामाच्या प्रगतीची संयुक्त पाहणी केली. कामाच्या गतीबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी महामेट्रो कंपनीच्या वतीने काम करताना पर्यावरण संवर्धनासाठी राबवत असलेल्या विविध उपायांचे कौतुक केले.केंद्र सरकारच्या आर्थिक विभागाने केलेल्या शिफारशीनंतर युरोपीयन इन्व्हेस्टमेंट बँक (ईआयबी) व फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) या दोन्ही बँका पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला अनुक्रमे ६०० दशलक्ष व २४५ दशलक्ष युरो कर्ज देण्यास तयार झाल्या आहेत. यापैकी युरोपीयन इन्व्हेस्टमेंट बँकेने (ईआयबी) पुणे मेट्रो प्रकल्पाला एकदा तर फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीने (एएफडी) प्रकल्पाला दोनदा भेट दिली आहे. गुरूवारी या दोन्ही संस्थांनी प्रत्यक्ष काम सुरू आहे त्याठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. ठेकेदार कंपनी तसेच महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी त्यांच्याकडून कामाची माहिती घेतली.ईआयबीच्या या प्रकल्पाच्या भुयारी मार्गाचे काम, मेट्रोचे ट्रॅक, डबे (रोलिंग स्टॉक), लिफ्ट आणि एस्कलेटर यासाठी कर्ज देणार आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांनी हे काम पहाणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.  तर एएफडीच्या शिष्ट मंडळातील प्रतिनिधींनी सिग्नलिंग आणि टेलिकॉम यंत्रणा यासाठी लागणाऱ्या अर्थसाह्याबाबत चर्चा केली. स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांनी काम कधी सुरू झाले, कसे सुरू आहे, त्याचे वेळापत्रक तयार केले का यासंबधी विचारणा केली.या पाहणी दरम्यान फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) यांच्या शिष्ठमंडळात पर्यावरण आणि सामाजिक प्रकल्प व्यवस्थापक सॅल्व्हीयन बेर्नाड, वाहतूक विभागाचे प्रकल्प प्रमुख प्रमुख मॅथ्यू व्हर्डियुअर आणि वाहतूक विभागाचे प्रोजेक्ट आॅफिसर रजनीश अहुजा यांचा समावेश होता. तर युरोपीयन इन्व्हेस्टमेंट बँक (ईआयबी) यांच्या शिष्ठमंडळात वरिष्ठ कर्ज वितरण अधिकारी सुनीता लुख्खू, सस्टेनेबल अर्बन मोबिलिटी विभागाचे वरिष्ठ अभियंता झोल्टन डोनथ, अभियंते बिर्गीनी क्यूएलट आणि सामाजिक तज्ज्ञ वेंकट राव यांचा समावेश होता. येत्या मार्च महिन्या अखेरपर्यंत या दोन्ही वित्तीय संस्थांकडून ८४५ दशलक्ष युरो इतक्या कर्जाला मंजूर मिळून लवकरच कराराची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रम्हण्यम यांनी सांगितले.  कास्टिंग यार्ड, लेबर कॅम्प, नदीपात्रातील प्रकल्पाचा मार्ग यांची पाहणी केली. याबरोबरच त्यांनी पर्यावरण आणि सामाजिक विषयाशी निगडीत प्रश्नासंदर्भात महामेट्रोच्या सल्लागारांशी देखील सखोल चर्चा केली.

अधिक माहिती देताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, की सध्या महामेट्रोच्या वतीने पीसीएमसी ते रेंज हिल आणि वनाझ ते सिव्हील कोर्ट या दोन्ही मार्गीकांवर पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून या दोन्ही मार्गांवर महामेट्रोने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा या दोन्ही शिष्टमंडळानी घेतला. हे करीत असताना महामेट्रोने इतक्या कमी वेळेत केलेल्या कामाची प्रशंसा देखील या दोन्ही एजन्सीनी केली. या दोन्ही शिमंडळातील प्रतिनिधी मेट्रोच्या या प्रगतशील प्रकल्पाच्या गतीमुळे आनंदी आहेत. याबरोबरच तोडण्यात आलेल्या एका झाडाच्या बदल्यात १० झाडांचे रोपण आणि वृक्षांचे पुनर्रोपण यांसारख्या महामेट्रो पर्यावरणासंदर्भात घेत असलेल्या विविध उपाययोजनांचे कौतुकदेखील या शिष्टमंडळाने केले आहे.  

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे