शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

चिंचवड : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, सासूवर सत्तूरने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:05 PM

दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली

पिंपरी : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर तसेच सासूवर देखील सत्तूरने वार केला. यात त्या दोघी गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सत्तूर जप्त केला. वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे सोमवारी (दि. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. 

रुपाली सुभाष गायकवाड आणि मंगल दळवी असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. सुभाष नामदेव गायकवाड (वय ४०, रा. नाव्हरे, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीपमाला लक्ष्मण कोर्टेकर (वय ३९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी सोमवारी  (दि. ११) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण रुपाली आणि आरोपी सुभाष गायकवाड हे पती-पत्नी आहेत. तसेच जखमी झालेल्या मंगल दळवी या फिर्यादी आणि रुपाली यांच्या आई आहेत. आरोपीने पत्नी रुपाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यात सत्तूराने वार करून गंभीर जखमी केले. त्याचवेळी मंगल दळवी या रुपाली हिला सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपीने तिला देखील जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्याही डोक्यात व हातावर वार करून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे. 

जखमी रुपाली आणि त्यांच्या आई मंगल दळवी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीपमाला कार्टेकर यांनी फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुभाष गायकवाड याला ताब्यात घेतले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड