पुणे : शहरात शनिवारी १७१ कोरोनाबाधित आढळून आले असून, १९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार २८५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.०६ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १ हजार ५५२ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही १८५ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २३७ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३३ लाख ३१ हजार ३८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून यापैकी ५ लाख २५१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८९ हजार ६८१ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोरोनास्थिती :
शनिवारी बाधित : १७१
घरी सोडले : १९६
एकूण बाधित रुग्ण : ५,००,२५१
सक्रिय रुग्ण : १,५५२
आजचे मृत्यू : ०७
एकूण मृत्यू : ९,०१८