पुणे : शहरात शनिवारी १८१ कोरोनाबाधित आढळून आले असून, दिवसभरात ३३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आजमितीला शहरात २ हजार ८७५ सक्रिय रुग्ण आहेत़
शनिवारी विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ६२० संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २. ३७ टक्के इतकी आहे. आज ८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २२६ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३५५ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २८ लाख ३२ हजार ६९८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८५ हजार ४६६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७६ हजार ८६६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७२५ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------