पुणे : शहरात शनिवारी २२१ कोरोनाबाधित आढळून आले असून, २५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ७३३ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.५३ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही २ हजार १०८ असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही २०९ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २४० इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३० लाख ५४ हजार ६२४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९१ हजार ६६५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ८० हजार ६७८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८७९ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोरोनास्थिती
शनिवारी बाधित : २२१
घरी सोडले : २५४
एकूण बाधित रुग्ण : ४,९१,६६५
सक्रिय रुग्ण : २,१०८
आजचे मृत्यू : ०९
एकूण मृत्यू : ८, ८७९