पुणे : शहरात शनिवारी २४४ कोरोनाबाधित आढळून आले असून, २६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ३१२ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.६२ टक्के इतकी आहे़
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार २८८ इतकी आहे़ आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २०८ इतकी असून, आॅक्सिजनसह उपचार घेणा-यांची संख्या २९१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३१ लाख ११ हजार ६८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून यापैकी ४ लाख ९४ हजार ९६८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८३ हजार ७६७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९१२ जणांचा मृत्यू झाला आहे.