लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट सुरू असून, शनिवारी दिवसभरात ३८० रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ६४१ रुग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ७०९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १८ रुग्णांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा ४ हजार ५६३ झाला आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, १ हजार ३४७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात १८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ३७९ झाली आहे. पुण्याबाहेरील १० मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ६४१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ५९ हजार १५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ७१ हजार ९५७ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ५६३ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ३०९ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत २५ लाख ३३ हजार १३० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
पुण्यातील कोरोनास्थिती
आज बाधित रुग्ण - ३८०
आज घरी सोडले - ६४१
एकूण बाधित रुग्ण - ४, ७१, ९५७
सक्रिय रुग्ण - ४, ५६३
आजचे मृत्यू - १८
एकूण मृत्यू - ८, ३७९