---------------
शिरूर : किरकोळ कामांसाठी नागरिकांना चार-चार वेळा घालावे लागणारे हेलपाटे, तालुक्यातील ओढे-नाले प्रकरण, कोरोना काळीतल तांदूळ-डाळ घोटाळा, अशा अनेक घटनांच्या निषेधार्थ आणि येथील प्रशासनाला देव सद्बुद्धी देवो, येथील कामकाज सुस्थितीत चालावे, यासाठी प्रत्यक्ष देवालाच साकडे घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिरूर तहसील कार्यालयातच सत्यनारायण पूजा घालून अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष दादा गव्हाणे, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, मनसेचे तालुका उपाध्यक्ष तेजस यादव, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, शहराध्यक्ष अविनाश घोगरे, जनहित कक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, रस्ते आस्थापना तालुकाध्यक्ष सुदाम चव्हाण, माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, भरत विधाटे, प्रमोद चव्हाण, कुणाल गुंजाळ, रोहित कुसाळे, प्रदीप पवार, भानुदास बोडरे, वैशालीताई साखरे, रवी लेंडे आदी उपस्थित होते. याबाबत शिरूर तालुका मनसे उपाध्यक्ष यादव व शहराध्यक्ष अविनाश घोगरे म्हणाले की, येत्या एक-दोन वर्षांत शिरूरमधील लोक साध्या कामांसाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारून त्रस्त झाले आहेत. प्रशासनाचा सावळा कारभार आणि अजब प्रकरणाबद्दल येणाऱ्या विविध आंदोलन केले आहे. शिरूर तालुक्यातील ओढे-ना प्रकरण, कोरोना काळातील तांदूळ, डाळीचा घोटाळा, गणेगाव खालसा येथील मंडल अधिकाऱ्याने केलेला खोटा पंचनामा, तळेगाव येथील वाळू घोटाळा, तहसील कार्यालयात बोकडाचा नैवेद्य, तहसील प्रशासनात अधिकारी यांनी नागरिकांकडे वेळोवेळी पैशाची मागणी, अशा अनेक प्रकरणांची माहिती सविस्तर येत्या ७ दिवसांत देण्यात यावी, असे निवेदन दिले. त्यानुसार तहसील कार्यालयाकडून या निवेदनास कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. शिरूर तालुका मनसे उपाध्यक्ष तेजस यादव यांनी सांगितले.
270821\img-20210827-wa0061.jpg
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिरुर तहसील कार्यालयावर
जनतेची होणारी पिळवणूकीच्या
निषेधार्थ सत्यनारायण महापुजे चे अनोखे आंदोलन करताना कार्यकर्ते