बेबीताई वाडेकर यांनी इतर सहकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानुसार सरपंच गणेश वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. उपसरपंचपदासाठी सत्यवान पानसरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. मतकर यांनी पानसरे यांची बिनविरोध निवड घोषित केली.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धैर्यशील पानसरे, माजी चेअरमन संजय आरेकर, ॲड. नामदेव वाडेकर, ग्रामपंचायत सदस्य अंकुश साबळे, आदिक वाडेकर, समाधान पानसरे, पंडित वाडेकर, बेबीताई वाडेकर, दीपाली आरेकर, रूपाली खलाटे, पूजा पानसरे, संगीता वाडेकर, अर्चना शेंडे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच सत्यवान पानसरे यांचा आमदार दिलीप मोहिते-पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुखदेव पानसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पदाच्या माध्यमातून गावातील समाजोपयोगी कामे मार्गी लावणार असल्याचे सत्यवान पानसरे यांनी सांगितले.
१३ शेलपिंपळगाव
सत्यवान पानसरे यांचा सत्कार करताना निर्मला पानसरे व इतर.