शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

पुणे महापालिका आयुक्तांचा कार्यभार सौरभ राव यांच्याकडे

By निलेश राऊत | Published: September 15, 2022 1:03 PM

वैद्यकीय कारणामुळे रजेवर असलेल्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा पदभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सुपूर्द

पुणे : वैद्यकीय कारणामुळे रजेवर असलेल्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा पदभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी रात्री याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

विक्रम कुमार यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून आयुक्त पदाबरोबरच महापालिकेचे प्रशासक पदही आहे.  दरम्यान बुधवारी रात्री ( १४ सप्टेंबर) प्रशासकाची मुदत संपली आहे. त्यामुळे नव्याने प्रशासक म्हणून कोण काम पाहणार, याबाबत राज्य शासनाकडून अद्याप महापालिकेला कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. महापालिका सभागृहाची मुदत १४ मार्च,२०२२ रोजी रात्री १२ वाजता संपली. त्यानंतर १५ मार्च पासून विक्रम कुमार यांनी महापालिका प्रशासक म्हणून शासनाकडून नियुक्ती करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून कुमार हे आयुक्त पदाबरोबरच प्रशासकाच्या ही भूमिकेत आहेत.

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची अद्याप पर्यंत घोषणा झाली नसल्याने कुमार यांना मुदत वाढ मिळणार असे बोलले जात होते. मात्र वैद्यकीय रजेवर असलेल्या कुमार यांच्या आयुक्त पदाचा पदभार राव यांच्याकडे देण्यात आला असून, महापालिका प्रशासक म्हणून कोणाची नियुक होणार हे अजून राज्य शासनाने स्पष्ट केलेले नाही.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तPuneपुणेHealthआरोग्य