पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या विचारात राष्ट्रभक्ती व राष्ट्रहित होते. हे आपण कधी समजून घेणार आहोत की नाही? सावकरांच्या विचारात देशभक्ती असेल, तर महात्मा गांधी यांच्या सारख्या व्यक्तीची हत्या करून स्वत:ला कलंकित करण्याची त्यांना इच्छा होती का? गांधीजींच्या विचारांचे समर्थन करणारे सावरकर गांधी हत्याकांडात सहभागी तरी होतील का? महात्मा गांधी हत्या प्रकरणात सावरकरांचा दुरान्वये देखील संबंध नव्हता. न्यायालयातही तेच सिद्ध झाले. त्यामुळेच त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र सावरकरांची अव्याहत बदनामी सुरू ठेवणाऱ्यांना आणखी कोणते पुरावे द्यावेत? असा खडा सवाल ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी मंगळवारी सावरकर विरोधकांसमोर उपस्थित केला.
गांधी हत्येशी सावरकरांचा दुरान्वये संबंध नाही : शेषराव मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:45 PM
न्यायालयाचा निकाल लोकशाहीत अंतिम मानला जातो. असे असतानाही सावरकरांचे गांधी, नेहरू परिवार व काँग्रेसशी असलेले संबंध समजून न घेता त्यांच्या बदनामीची मोहिम अद्यापही का सुरू आहे? असा प्रश्न पडतो.
ठळक मुद्देसावरकरांची भूमिका गांधी अथवा काँग्रेसविरोधी नव्हती हे अनेक पत्रातून स्पष्टमृत्यूनंतरही स्वातंत्र्यवीरांची होत असलेली बदनामी माझ्या मनाला पटत नाही.