आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील जवळे येथे अनिल रमेश वाळुंज खिलार जातीच्या बैलावर बिबट्याने सोमवारी मध्यरात्री हल्ला केला. मात्र, बैलाने जीवाच्या आकांताने हंबरडा फोडल्याने खिलारे कुटुंब जागे झाले. त्यावेळी कुटुंबियांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. तर तालुक्यातील दुसऱ्या घटनेत वळसे मळयातील शेतकरी संदिप निवृत्ती हिंगे यांच्या गोठ्यातील शेळीवर मंगळवारी (दि.२४ ) रोजी पहाटेच्या सुमारास हल्ला करून बिबट्याने तिला ठार केले. निरगुडसर परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त वावर आहे. अनेक शेतकऱ्यांनी बिबटया प्रत्यक्ष पाहिला देखील आहे. काही ठिकाणी मागणीनुसार वन विभागाने वेगवेगळया ठिकाणी पिंजरा लावलेला आहे. सोमवारी पहाटे अनिल रमेश वाळुंज यांच्या गोठ्यातील बैलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यातून वाचण्यासाठी बैल मोठ्याने हंबरडा फोडू लागला. यामुळे खिलारे कुटुंब जागे होऊन बाहेर आले. तेव्हा त्यांना बिबटयाने तोंडात बैलाची मान धरल्याचे निर्दशनास आले. त्यावेळी त्यांनी आरडा-ओरडा करून बैलाला बिबट्याच्या तावडीतुन सोडविले. या घटनेत बैल गंभीर जखमी झाला आहे. बिबटयाला पकडण्यासाठी वेगवेगळया ठिकाणी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात येईल. मात्र नागरिकांनी रात्री अपरात्री बाहेर पडताना बॅटरी व काठी घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.---------------------------------------------
बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला बैलाचा प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 5:53 PM
आंबेगाव तालुक्यातील जवळे येथे अनिल रमेश वाळुंज खिलार जातीच्या बैलावर बिबट्याने सोमवारी मध्यरात्री हल्ला केला.
ठळक मुद्देबिबटयाला पकडण्यासाठी वेगवेगळया ठिकाणी वनविभागातर्फे पिंजरा वनविभागातर्फे नागरिकांनी रात्री बाहेर पडताना बॅटरी व काठी घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन