पुणो : न:हे येथे इमारत कोसळून झालेल्या अपघातावेळी रात्री तीनच्या सुमारास इमारत कोसाळताना स्वत:च्या जिवाची पर्वा न करता, इमारतीमधील इतर रहिवाशांना बाहेर काढणा:या संदीप मोहितेला या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे. या इमारतीच्या पार्किगमध्ये ढिगा:याखाली अडकलेल्या संदीपचा मृतदेह सायंकाळी पाचच्या सुमारास एनडीआरएफला ढिगा:याखालून काढला.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत सहाव्या मजल्यावर मूळचे साता:याचे असलेले दिलीप मोहिते यांचे कुटुंब भाडय़ाने राहत होते. राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले दिलीप मोहिते हे पत्नी आणि मुलगा संदीपसह राहत होते. याच इमारतीत त्यांची मुलगी आणि जावईही राहत होते. ज्या घरात मोहिते कुटुंब राहत होते, तेच घर विकत घेण्याची तयारी त्यांनी केली होती.
कराड येथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला संदीप हा मार्केट यार्ड येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास इमारतीला तडे जाऊन आवाज सुरू झाला. या वेळी संदीपने आपल्या आई-वडिलांसह बहिणीलाही घराबाहेर काढले.
या वेळी इमारत खचू लागल्याने अनेक घरांचे दरवाजे त्याखाली दबू लागले होते. त्यांत अनेक कुटुंबे होती. त्यांना दरवाजा अडकल्याने बाहेर पडता येत नव्हते. या वेळी संदीपने या घरांचे दरवाजे तोडून या कुटुंबीयांना बाहेर काढण्यासाठी, तसेच त्यांना बाहेर पडण्यासाठी मदत केली. मात्र, इमारतीमधील सर्व रहिवासी बाहेर आल्यानंतर आपली दुचाकी पार्किग बाहेर काढून आणली. त्यानंतर पुन्हा संदीप आपली नवी चारचाकी पार्किगमधून बाहेर काढण्यासाठी गेला. या वेळी काळाने त्याचा घात केला.
ही माहिती घटनास्थळी दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकाला रहिवाशांनी तत्काळ दिली. त्या वेळी पार्किगच्या बाजूचे ढिगारे उपसण्याचे काम एनडीआरएफ कडून तातडीने हाती घेण्यात आले. मात्र, संदीपर्पयत पोहोचण्यासाठी पथकाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. (प्रतिनिधी)