आळंदी : आषाढी व कार्तिकी हे महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे अभिन्न अंग आहे. शेकडो वर्षे पंढरीच्या वारीत लाखो वारकरी व नागरिक या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. मात्र, कोरोना महामारीमुळे मोजक्याच भक्तांच्या सहभागाने हा सोहळा तितक्याच उत्साहाने संपन्न होत आहे. शुक्रवारी संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. यानिमित्त विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आळंदी येथील संजीवनी समाधीस पुष्पहार अर्पण केला. तसेच महाराष्ट्र व देशातील कोरोना नष्ट व्हावा व सामान्य जनजीवन व वारी पुन्हा पूर्वीच्याच दिमाखाने साजरी व्हावी, अशी प्रार्थना माऊलीचरणी केली.
या प्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, आळंदी देवस्थान ट्रस्टचे अभय टिळक, योगेश देसाई, सोहळाप्रमुख विकास ढगे, माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, नगरसेविका शैला, अविनाश तापकीर, शहरप्रमुख अविनाश तापकीर, विजया शिंदे, मंगल सोनवणे, उपशहर प्रमुख आनंद गोयल, पोलीस निरीक्षक मोहन यादव, तम्मा विटकर, युवराज शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आळंदीशी शिवसेनेचे अतूट नाते आहे. वारकरी तर सर्वांमध्ये विठ्ठल पाहतात. मंदिर परिसरातील ज्याप्रमाणे सजावट आणि व्यवस्था केली आहे ती अतिशय आकर्षक असल्याचे देखील त्या म्हणाल्या. सन १८९७ मध्ये प्लेगचा प्रादुर्भाव वाढला होता त्या वेळी ज्योतिबाची यात्रा बंद करण्याचा श्रीमन्महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी निर्णय घेतला होता. याच थोर लोकांच्या पावलावर पाऊल टाकत असून उत्तम सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. त्यामुळे विरोधक काय टीका करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि टीकेला महत्त्व देत नाही. दरम्यान, यावेळी अन्नदानासाठी गोऱ्हे यांनी देणगी दिली.
०२ आळंदी गोऱ्हे
माऊलींच्या संजीवन समाधीस प्रणाम करताना नीलम गोऱ्हे.
Attachments area.