लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर : तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळणार नाही ह्याची दक्षता गावच्या पोलिस पाटील यांनी घेवून कोरोना ह्या महामारीपासून आपले गाव वाचवावे असे आवाहन घोडेगाव पोलिस स्टेशनसचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी केले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे पश्चिम भागाच्या पोलिस पाटील यांची गाव नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पवार बोलत होते. पवार म्हणाले, तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांमध्ये लग्न समारंभ व दशक्रिया विधी या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे ही गावे कोरोना हाॅटस्पाॅट झाली आहेत. मागील काही दिवसांपासून अत्यंत डोंगर दऱ्याखोऱ्यांमध्ये असणारी गावे वाड्यावस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होते. परंतु आता दोन चार दिवसांपासून रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्येक पोलिस पाटलांनी आपल्या गावामध्ये होणारे लग्न समारंभ व दशक्रिया विधी शासनाने दिलेल्या अटी शर्तींवर करुन आपल्या गावामध्ये कोरोना रुग्ण वाढणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. दशक्रिया विधी जरी भावनिक कार्यक्रम असला तरी गर्दी केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असून कोरोना लसीकरण करण्यापासून कोणीही वंचित राहू नये, प्रशासनाला सहकार्य करावे.
या बैठकी दरम्यान पश्चिम आदिवासी भागातील पोलीस पाटील यांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन गावामध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाही, त्याचप्रमाणे आदिवासी भागातील प्रशासक असणारे ग्रामसेवक व तलाठी हे आठवड्यातील एक वेळा येतात तर बहुतेक ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीकडे ढोंकूनही पाहत नाहीत, अशा तक्रारी केल्या. यावेळी आपत्ती व्यवस्थापन कायद्या अर्तंगत ग्रामसेवक हे मुख्यालयी राहणे बंधन कारक आहेत, अशा कडक सूचना ही मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांच्या समवेत मंचर येथे झालेल्या बैठकी दरम्यान संबंधित विभागाला दिल्या आहेत. ग्रामसेवक येत नसतील तर सरपंच व सदस्य यांनी या बाबतची लेखी तक्रार मुख्य कार्यकारी आधिकारी यांना करावी जर सरपंच व सदस्य हे तक्रार करत नसतील तर पोलीस पाटील यांनी या बाबत लेखी तक्रार करा असे पवार यांनी सांगितले.
यावेळी राजपूरचे जेष्ठ पोलिस पाटील उत्तम वाघमारे गाडेवाडी येथील सतिश भोते, कोंढवळ येथील सुभाष कारोटे, फलोदे येथील विजय मेमाणे, तळेघरचे सरपंच चंद्रकांत उगले, पोलीस हवालदार अमोल काळे, स्वप्निल कानडे, अशोक कोळप उपस्थित होते.
फोटो ई मेल करत आहे
फोटो :- तळेघर (ता. आंबेगाव) येथे पश्चिम भागाच्या पोलीस पाटील यांच्या गाव नियोजन बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार