बारामती : बारामती नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याने सांगवी येथील निरा नदीत वाहुन जाणाऱ्या मुलीचा जीव वाचला आहे. बुडू लागलेल्या सहा वर्षीय मुलीला वाचविण्यासाठी या युवकाने धाडसाने निरा नदीत उडी घेतली. हैदरअली चांदमहंमद शेख असे या युवकाचे नाव आहे. शनिवारी(दि २८) शिरवली ( ता.बारामती) येथे हा प्रकार घडला आहे. शनिवारी (दि.२८) सकाळच्या सुमारास शिरवली येथील स्मशानभुमीच्या जवळ निरा नदीवर कार्तिकी भोसले ही सहा वषार्ची मुलगी आपल्या आई सोबत नदीच्या कडेला धुणे धूवण्यासाठी गेली होती. यावेळी ती पाण्यात कडेला पाण्यात खेळत होती.अचानक ती पोहता पोहता खोल खड्ड्यात गेली .यावेळी ती या खड्यातील पाण्यात बुडू लागली.नदीतील प्रवाहामुळे ती आणखी वाहत जाऊन किनाºयापासुन ती ३०० फूट लांब गेली होती. यावेळी नुकताच कोंबड्याची पिसे टाकण्यासाठी युवक दुचाकीवर तिथं आला होता. याच वेळी कार्तिकी बुडत असल्याने तिच्या आईसह तेथील महिलांनी आरडाओरड सुरु होती. त्यावेळी मुलगी पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वाहत जात असल्याचे त्या युवकाच्या निदर्शनास आले. यावेळी त्या युवकाने आपल्या जीवाची परवा न करता पळत जाऊन पाण्यात उडी मारली.तसेच कार्तिकीला पाण्याबाहेर काढले. त्यावेळी ती बेशुद्ध आवस्थेत होती. तिला बाहेर काढून तिच्या तोंडात गेलेले पाणी बाहेर काढण्यासाठी प्रथमोपचार करण्यात आले.यावेळी ती बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आली. आपली मुलगी सुखरूप बाहेर आल्याचे पाहुन तिच्या आईचे डोळे पाणावले.तिच्या आईने त्या युवकाचे हात जोडुन आभार मानले. हैदरअली चांदमहंमद शेख असे या धाडसी युवकाचे नाव आहे. तो शिरवली (ता.बारामती) येथे वास्तव्यास आहे. तो बारामती नगरपरिषदेत नोकरी करत आहे. त्याच्या धाडसी कामगिरीबद्दल सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. तसेच गावकऱ्यांनी देखील हैदरचे अभिनंदन केले आहे.------------------------
निरा नदीत वाहुन जाणाऱ्या मुलीचा जीव वाचवला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 8:01 PM
बारामती नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याची धाडसी कामगिरी
ठळक मुद्देधाडसी कामगिरीबद्दल सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव