सिद्धेश्वर ढफळे व संकेत गाणार हे दोघे सायकलस्वार सकाळी सात वाजता कात्रजच्या घाटातून चालले होते. त्यावेळी अचानक त्यांना रस्त्याच्या कडेला कचरापेटी मध्ये बाळाला दुपट्ट्यामध्ये गुंडाळून टाकलेले आढळले. त्यांनी लगेच फोन करून ही गोष्ट पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक मधुरा कोराणे आपल्या दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचल्या व त्यांनी बाळाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. बाळाचे प्राण वाचले असून बाळ ठिकठाक आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी ही माहिती लोकमतला दिली. आसपासच्या भागातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून बाळाला टाकून जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फोटो ओळ - भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक मधुरा कोराणे बाळासोबत.