मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी म्हणून मातांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पोषण आहारासंबंधी प्रबोधन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्त्री शिक्षणाविषयी जागरुकता यावी यासाठी सावित्री दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. अंगणवाड्या विविध कार्यक्रम, यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा, कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी केलेल्या कामांबाबत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा सत्कार करण्यात येणार आहेत. याशिवाय गावातील सर्व महिलांसाठी सकस आहाराच्या पाककृतीचे प्रात्यक्षिक, अंगणवाडीतील लहान मुलींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पेहराव परिधान करुन स्त्री शिक्षणाचे आवाहन करणे, गावातील नवजात मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, गावातील प्रौंढ महिलांनी सावित्रीबाईंच्या कथेचे वाचन करणे आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत सर्व गटविकास अधिकार्यांना मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सूचना केल्या आहेत.
जिल्ह्यात उद्या होणार सावित्री उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:08 AM