पुणे : सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठाचा ११४ वा पदवीप्रदान सोहळा आज पार पडत आहे. या समारंभासाठी यावर्षीपासून ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढऱ्या रंगाचा पायजमा, उपरणे, फक्त मान्यवरांसाठी पूर्वीप्रमाणेच पगडी असा पोशाख आहे. या बदलावरून अनेक मत-मतांतरे व्यक्त झाली होती. सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदवीप्रदान सोहळा पार पडत आहे. समारंभात पदक आणि पुरस्कार मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगात कुर्ता-पायजमा हा पारंपरिक पोषाख आहे. मात्र डोक्यावर ब्रिटीश पद्धतीची गोल टोपी होती. पण पारंपारिक पोषाखावर पुणेरी पगडी घालण्यास काही विद्यार्थी संघटनांनी विरोध केल्याने वाद रंगला.
यंदा १ लाखांहून अधिक पदवी प्रमाणपत्र प्रदान
पदवीप्रदान समारंभात विविध विद्या शाखांमधील पदव्युत्तर स्तरावरील एकूण 21 हजार 366 पीएचडीच्या 441 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. 70 सुवर्णपदक प्रदान केले जाणार आहे. त्यानंतर पदवी स्तरावरील 80 हजार 613 विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे त्यांच्या महाविद्यालयांकडे पाठवण्यात येणार आहेत. ती त्यांना महाविद्यालयांमधून मिळतील.
विद्यार्थ्यांचा बदललेल्या ड्रेस कोडला अल्प प्रतिसाद
यंदापासून काळ्या गाऊन ऐवजी ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढऱ्या रंगाचा पायजमा, उपरणे असा ड्रेसकोड ठेवण्यात आला. मात्र या सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी बदललेल्या ड्रेसकोडला अत्यंत अल्प प्रतिसाद दिला आहे. काही विद्यार्थी तर जुनाच काळा गाऊन घालून फोटो काढत असल्याचे चित्र दिसून आले.
- पदवी प्रदान सोहळ्यात मान्यवरांना पुणेरी पगडी ठेवण्यात आल्याने विद्यार्थी संघटनांकडून निदर्शने- विद्यार्थ्यांची धरपकड सुरू, पदवी प्रदान समारंभात तणावाचे वातारवरण- पोशाख पेशवाईच्या काळातील करण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप- लोकतांत्रिक जनता दल, एसएसयुआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून पेशवाई पोशाखाचा निषेध- गाढवांना पुणेरी पगडी घालून समारंभात सोडणार, पोलीस बंदोबस्त वाढवला