फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर एज्युकेशन सोसायटीचे आर आर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती भोर यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत नुकतीच बैठक झाली. भोर मधील सामाजिक कार्यकर्त्या हशिना शेख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली ती पुढील प्रमाणे कार्याध्यक्ष सविता कोठावळे स्वागताध्यक्षा सुनंदा गायकवाड उपाध्यक्ष सुजाता भालेराव आणि सुजता दळवी सचिव डॉक्टर विजय पाटील आहेत.
विचार महोत्सवाचे उदघाटन कोल्हापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अवनी संस्थेच्या संस्थापक अनुराधा भोसले यांच्या हस्ते होणार आहे तर अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वृषाली रणधीर असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील सहाय्यक आयुक्त संतोष हराळे आणि सॉलिसिटर प्रसाद शिंदे उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात राजमाता सावित्रीबाई फुले कार्य गौरव पुरस्कारांचे वितरण केले जाणार असून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा भोसले यांना हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉक्टर मनोहर जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे यावेळी भारतीय मोरे यांचा मी सावित्रीबाई बोलते हा एकपात्री प्रयोग आयोजित केला असून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सन्मानही केला जाणार आहे.