पुणे : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या घटनेला १७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ७० विद्यार्थीनींनी भिडे वाड्याला मानवंदना देत पुष्पवृष्टी केली. मुलींना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करुन दिलेल्या या क्रांतीज्योतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. देखील भिडे वाड्याचे पूजन करण्यात आले. फुले पती-पत्नींच्या वेशातील कलाकारांनी मुलींचा वर्ग घेत भिडे वाड्याचा इतिहास उलगडला. इतिहास प्रेमी मंडळतर्फे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील भिडे वाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अशोक गोडसे, अॅड. शिवराज कदम जहागीरदार, मंडळाचे मोहन शेटे यावेळी उपस्थित होते. दिव्या ढमाले आणि शुभंकर माळवदे या कलाकारांनी तसेच सेवासदनच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. मोहन शेटे म्हणाले, ‘सावित्रीबाई फुले यांनी समाजाकडून होणारा अन्याय सहन करत प्रतिकूल परिस्थितीत मुलींना शिकवण्याचे प्रयत्न सुरु ठेवले. त्यांच्यामुळेच आज मुली चांगले शिक्षण घेऊन सर्वच क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्या पुढेच आहेत.’
‘सावित्रीबाई आम्ही कृतज्ञ आहोत’; विद्यार्थीनींनी भिडे वाड्याला दिली मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 4:15 PM
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या घटनेला १७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ७० विद्यार्थीनींनी भिडे वाड्याला मानवंदना देत पुष्पवृष्टी केली.
ठळक मुद्देइतिहास प्रेमी मंडळतर्फे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील भिडे वाडा येथे कार्यक्रमाचे आयोजनफुले पती-पत्नींच्या वेशातील कलाकारांनी मुलींचा वर्ग घेत भिडे वाड्याचा उलगडला इतिहास