पुणो : शास्त्रीय संगीतप्रेमी आतुरतेने वाट पाहत असलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा 11 ते 14 डिसेंबरदरम्यान पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे आयोजित केला जाणार असल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितल़े
या महोत्सवाचे यंदाचे 62वे वर्ष असून, महोत्सवाचा अन्य तपशील पुढील महिन्यात जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितल़े भारतरत्न स्वरभास्कर पं़ भीमसेन जोशी यांनी आपले गुरू सवाई गंधर्व यांच्या नावाने 1953मध्ये या महोत्सवाची सुरुवात केली़ हा महोत्सव आर्य प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित केला जातो़ भारतीय शास्त्रीय संगीतातील एक लोकप्रिय महोत्सव म्हणून हा महोत्सव ओळखला जातो़पूर्वी हा महोत्सव 3 दिवस चालत असत़े मात्र, न्यायालयाने रात्री दहाचे बंधन घातल्यानंतर हा महोत्सव सकाळ, दुपार व सायंकाळ अशा तीन सत्रंत चार दिवस होत आहे. (प्रतिनिधी)