पुणे : “हडपसर येथील कचरा डंपिंग प्रकरणी महापौर दालनात चर्चा करू, असे आश्वासन मला वारंवार मिळाले. ‘महापौर साहेब तुमची चहा-खारी नको, मी बिर्याणी देतो पण हडपसरला कचरा नको,” अशी मागणी करीत नगरसेवक योगेश ससाणे यांनी महापालिकेच्या सभागृहात चक्क बिर्याणीचे पातेलेच आणले.
‘हडपसरला कचरा नको’, या मागणीचा फलक परिधान करून ‘व्हेज बिर्याणी’चे पातेले घेऊन ससाणे यांनी सभागृहात प्रवेश केला. सभा संपल्यावर लागलीच दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी चर्चा करून यावर मार्ग काढावा, असा आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेा.
दरम्यान सभासदांना या सभागृहात कायम सन्मानाची वागणुक दिली जात असताना, अशा प्रकारे बिर्याणी घेऊन येऊन सभासद कशाप्रकारेही सभागृहात वागत असतील तर हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, या शब्दात महापौरांनी ससाणे यांच्या कृत्याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली़ “हडपसरच्या कचराप्रश्नी वारंवार मागणी करूनही प्रश्न मार्गी लागत नाही़ आज १ लाख टन कचरा साचला आहे़ त्यावर तेथेच अशास्त्री पद्धतीने प्रक्रिया केली जाते,” असे ससाणे म्हणाले.
------------------------
फोटो मेल केला आहे़