शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

टंचाई आराखडा ४१ कोटींचा

By admin | Published: January 21, 2016 1:25 AM

जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळग्रस्त पूरस्थिती व निर्माण होणारी गंभीर पाणीटंचाई लक्षात घेता पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सुमारे ४० कोटी ९१ लाख

पुणे : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळग्रस्त पूरस्थिती व निर्माण होणारी गंभीर पाणीटंचाई लक्षात घेता पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सुमारे ४० कोटी ९१ लाख रुपयांच्या टंचाई कृती आराखड्याला जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे. गेल्या काही वर्षांत यंदा प्रथमच टंचाई आराखडा चार महिने अगोदरच म्हणजे जानेवारी महिन्यात मंजूर करण्यात आला आहे. यामुळे प्रत्यक्ष पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच जिल्ह्यात टंचाईच्या कामांना सुरुवात होण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिली.कंद यांनी सांगितले की, जिल्ह्यात एप्रिल-मेनंतर निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व्हे करण्यात आला. यामध्ये टंचाईग्रस्त भागात नवीन विंधनविहिरी घेणे, नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळपाणीपुरवठा योजना सुरूकरणे, टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, विहिरीचे अधिग्रहण करणे आदी विविध कामे टंचाई कृती आराखड्यामध्ये सुचविण्यात आली आहेत. दर वर्षी जानेवारी-फेबु्रवारी महिन्यात सर्व्हे करून एप्रिल-मे महिन्यात टंचाई आराखड्याला मान्यता देण्यात येते. आराखड्याला उशिरा मान्यता मिळाल्यावर निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष काम करण्यासाठी खूपच उशीर होतो आणि पाऊस सुरू झाला की टंचाईची कामे सुरू होतात. हा आतापर्यंतचा अनुभव होता. त्यामुळे या वेळी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातच संपूर्ण जिल्ह्यात प्रामुख्याने टंचाईग्रस्त भागात पाहणी करून, ग्रामसभेची मागणी लक्षात घेऊन टंचाई कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील तातडीने या आराखड्याला मान्यता दिली.