शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

जिल्ह्यात देखाव्यांची रेलचेल

By admin | Published: September 23, 2015 3:29 AM

जिल्ह्यात विविध गणेश मंडळांनी या वर्षी पारंपरिक, तसेच धार्मिक देखाव्यांवर भर दिला आहे. अनेक मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करीत दुष्काळग्रस्तांना मदत केली आहे

जिल्ह्यात विविध गणेश मंडळांनी या वर्षी पारंपरिक, तसेच धार्मिक देखाव्यांवर भर दिला आहे. अनेक मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करीत दुष्काळग्रस्तांना मदत केली आहे. पावसामुळे देखावे पाहण्यासाठी फारसे कुणी बाहेर पडले नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने नागरिक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडल्याने सर्व रस्ते फुलले होते. ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) शहरात एकूण १२ मंडळे आहेत. सर्व मंडळांनी संगीतावर चालणारी विद्युतरोषणाई सजावट म्हणून केली आहे. जय बजरंग सेवा गणेश मंडळ ओतूर या मंडळाचे हे ५५ वे वर्ष आहे. या मंडळाचे अध्यक्ष जयसिंग डुंबरे, उपाध्यक्ष बापूसाहेब डुंबरे व सचिव धोंडीभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली ओतूर येथील पांढरी मारुती मंदिराच्या खुल्या व्यासपीठावर गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. समाजप्रबोधनासाठी दररोज सायंकाळी कीर्तने-भजने ठेवून कीर्तन महोत्सव साजरा करीत आहे. अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ मार्केट यार्ड ओतूर : हलता देखावा. या मंडळाचे हे १३ वे वर्ष आहे. या मंडळाने या वर्षी प्रथमच बैलगाडा शर्यत हा हलता देखावा सादर करून अश्वारूढ मार्तंड भैरवनाथ आकर्षक गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. रात्री हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. या मंडळाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.